स्वादिष्ट पौष्टिक गाजराका हलवा बिना साखर बिना खवा असा हलवा कधी बनवला नसेल
Delicious Gajar Ka Halwa Carrot Halwa Without Sugar Mawa In Marathi
गाजर चा हलवा आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. पण आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आपण गाजर चा हलवा बनवताना साखर किंवा मावा वापरणार नाही तरी सुद्धा त्याची टेस्ट अप्रतिम लागते.
The Delicious Gajar Ka Halwa Carrot Halwa Without Sugar Mawa In Marathi can be seen on our You tube Chanel Gajar Ka Halwa Carrot Halwa Without Sugar Mawa
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांना काहीना काही तबेतिच्या तक्रारी असतात. मग काही जणांना साखर चालत नाही तर काही जणांना खवा चालत नाही. तर आज आपण ह्या तक्रारीच्या निवारण करून अगदी मनसोक्त गाजरचा हलवा सेवन करू शकतो.
आपण साखर च्या आयवजी गूळ वापरणार आहोत जो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे व खवा च्या आयवजी मावा वापरणार आहोत.
साहित्य:
500 ग्राम गाजर (लाल चटुक)
1/2 लीटर दूध (फूल क्रीम)
1/2 वाटी गूळ
2 टे स्पून मिल्क पाऊडर
1 टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून तूप
4-5 बदाम व काजू
थोडे किसमिस
कृती: गाजर स्वच्छ धुवून, सोलून, किसून घ्या.
एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये काजू, बदाम व किसमिस तळून घेऊन बाजूला ठेवा. मग त्याच कढईमध्ये किसलेला गाजराचा कीस घालून 2-3 मिनिट परतून घ्या. म्हणजे गाजरा मधील पाण्याचा अंश कमी होईल.
मग त्यामध्ये दूध घालून मिक्स करून दूध आटवून घ्या. दुध आटले की मग त्यामध्ये किसलेला गूळ किंवा गुळाची पावडर मिक्स करून गूळ पूर्ण विरघळवून घ्या. मग त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
आता दोन मिनिट गरम करून विस्तव बंद करा. गरम गरम शाही गाजरचा हलवा ड्रायफ्रूट ने सजवून सर्व्ह करा.