समोसा कचोरी विसरून जाल असा कमी तेलातील नाश्ता नेहमी बनवायल
Different Style Aloo-Suji Less Oil Nashta For Kids In Marathi
आपल्याला रोज प्रश्न पडत असेल नाश्तासाठी निराळे काय बनवायचे म्हणजे मुले खुश होतील. आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने व अगदी निराळा नाश्ता बनवणार आहोत. अश्या प्रकारचा नाश्ता बनवला तर समोसा, कचोरी विसरून जाल. तसेच अगदी कमीत कमी तेलात मस्त टेस्टि नाश्ता बनवणार आहोत. त्यामुळे घरातील सर्व मंडळी खुश होतील.
The Different Style Aloo-Suji Less Oil Nashta For Kids In Marathi can be seen on our You tube Chanel Different Style Aloo-Suji Less Oil Nashta For Kids
आपण नाश्ता जो बनवणार आहोत त्यासाठी रवा वापरणार आहोत व सारणासाठी बटाटा वापरणार आहोत. मग वाफवून अगदी चमचाभर तेलात अगदी मिनिटभर परतून घेणार त्यामुळे त्याची टेस्ट सुद्धा वाढणार आहे.
आवरणांसाठी साहित्य:
१ कप बारीक रवा
१ टे स्पून तांदळाचे पीठ
१ टी स्पून चिलीफ्लेस्क
१ टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
सारणासाठी साहित्य:
२ मध्यम आकाराचे बटाटे
२ टे स्पून कांदा (बारीक चिरून)
२ टे स्पून कोथिंबीर
१ टी स्पून लिंबुरस
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
फोडणी करिता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
सजावटीसाठी साहित्य:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून कलोंनजी
१ टी स्पून तीळ
७-८ कडीपत्ता पाने
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये बारीक रवा, तांदळाचे पीठ, चिलीफ्लेस्क, कोथिंबीर व मीठ मिक्स करून घ्या, मग लागेल तसे पाणी वापरुन पीठ मळून झाकून १० मिनिट बाजूला ठेवा.
सारणासाठी: बटाटे सोलून, किसून दोन वेळा पाण्यानी धुवून घ्या. कोथिंबीर व हिरवी मिरची धुवून चिरून घ्या. एका पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, कांदा घालून एक मिनिट परतून घेऊन हिरवी मिरची घालून हळद व मीठ घालून मिक्स करून किसलेला बटाटा घाला मिक्स करून १-२ मिनिट झाकण ठेवा मधून एकदा झाकण काढून चमच्यानी हलवून परत झाकण ठेवा.
आता झाकण काढून त्यामध्ये लिंबुरस व कोथिंबीर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
मग मळलेल्या पिठाचे दोन भाग करून घ्या, एक भाग घेऊन चपाती सारखा लाटून वाटीच्या सहयानी गोल गोल पुऱ्या कापून घ्या, मग एक छोटी पुरी घेऊन त्यावर एक चमचा सारण ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवा मग काटे चमचा घेऊन पुरीच्या बाजूनी दाबून डिझाईन करा, अश्या प्रकारे सर्व बनवून बाजूला ठेवा.
एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा, पाणी गरम झाले की त्यावर एक चाळणी ठेवून त्यावर बनवलेला नाश्ता ठेवा. मग चाळीवर झाकण ठेवून मध्यम विस्तवावर १० मिनिट वाफ द्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तीळ, कलोनजी, कडीपत्ता पाने घालून मिक्स करून त्यावर बनवलेला नाश्ता ठेवून तेलावर एक मिनिट गरम करून घ्या, वरतून खालतून नाश्ताला तेल लागले पाहिजे.
आता गरम गरम नाश्ता सर्व्ह करा.