मार्गशीर्ष अमावस्या 2024 दुर्लभ संयोग करा उपाय होईल उन्नती वर्षातील शेवटची अमावस्या
Margashish Amavasya 2024 Durlabh Yog And Satik Upay In Marathi
30 डिसेंबर 2024 सोमवार मार्गशीर्ष अमावस्या ही ह्या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. ह्या अमावस्याला असा दुर्लभ संयोग येत आहे की आपण जे काही कार्य कराल त्यामध्ये वृद्धी होईल. ह्या दिवशी पितृ ऋण, देव ऋण व ऋषि ऋण पासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय केले जातात. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पूजापाठ करून दानधर्म करा त्यामुळे पुण्य मिळेल. मार्गशीर्ष अमावस्या ह्या दिवशी दुर्लभ संयोग येत आहे, त्याचा प्रभाव काय आहे व अमावस्याच्या दिवशी काय करावे हे आपण पाहणार आहोत.
The Margashish Amavasya 2024 Durlabh Yog And Satik Upay In Marathi can be seen on our You tube Chanel Margashish Amavasya 2024 Durlabh Yog And Satik Upay
मार्गशीर्ष अमावस्या कधी आहे?
हिंदू कॅलेंडर नुसार मार्गशीर्ष अमावस्या 30 डिसेंबर 2024 सोमवार ह्या दिवशी आहे.
अमावस्या तिथी प्रारंभ: 30 डिसेंबर सोमवार पहाटे 4 वाजून 1 मिनिट
अमावस्या तिथी समाप्ती: 31 डिसेंबर मंगळवार पहाटे 3 वाजून 56 मिनिट
मार्गशीर्ष आमवस्या सूर्योदय 30 डिसेंबर सकाळी 7 वाजून 13 मिनिट
दुर्लभ संयोग मार्गशीर्ष अमावस्या 2024:
30 डिसेंबर 2024 सोमवार ह्या दिवशी वृद्धी योगचा दुर्लभ योग येत आहे. सोमवार आहे त्यामुळे सोमवती अमावस्या आहे. त्यामध्ये शिव व शक्ति ह्यांची कृपा प्राप्त होते. ह्या दिवशी वृद्धी योग रात्री 8 वाजून 32 मिनिट पर्यन्त आहे. वृद्धी योग हा शुभ योगा मधील एक योग आहे. ह्या योगामध्ये आपण जे सुद्धा चांगले कार्य कराल त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊन त्यामध्ये वृद्धी मिळेल.
मार्गशीर्ष अमावस्या वृद्धी योग महत्व:
वृद्धी योगामध्ये आपण जे सुद्धा चांगले कार्य कराल त्यामध्ये कोणते सुद्धा विघ्न किंवा बाधा येणार नाही. जर आपल्याला कोणता नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यामध्ये सफलता मिळेल व नेहमी वृद्धी होत जाईल.
मार्गशीर्ष अमावस्या वृद्धी योगाचे विशेष महत्व:
1. मार्गशीर्ष अमावस्या ह्या दिवशी वृद्धी योगामध्ये पितरांना तर्पण, पिंडदान किंवा श्राद्ध कर्म केल्याने पितर तृप्त होतात. त्यामुळे आपल्याला पुण्य मिळते व ते पुण्य व आशीर्वाद आपल्याला वृद्धी होण्यास सहायक ठरतात.
2. मार्गशीर्ष अमावस्या ह्या दिवशी वृद्धी योगामध्ये दान करणे पितर, देव व ऋषि तिन्ही प्रसन्न होतात. आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होईल व त्याचे फळ सुद्धा वाढीव मिळेल. अन्न व वस्त्र दान आपल्याला पितृ, ऋषि व देव हे तिन्ही आपल्याला ऋणा मधून मुक्त करतात.
सोमवती अमावस्याच्या दिवशी दिवा लावण्याच्या उपाय:
सनातन धर्म अनुसार संध्याकाळी धनाची देवी माता लक्ष्मीसाथी घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी:
सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे कपडे परिधान करून पितरांचे स्मरण करून तर्पण द्या. तर्पण देताना काळे तीळ, पांढरे फूल, व कुश घालून पितरांना पाणी घ्या.
सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करा. त्यामुळे पितृ दोष दूर होण्यास मदत होईल. त्याच बरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. मोहरीच्या तेलात काळे तीळ घालून दिवा लावावा. त्यामुळे पितृ दोष दूर होईल.
सोमवती अमावस्याच्या दिवशी नाराज पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृ चालीसाचे पठन करावे. त्यामुळे त्यांच्या आत्माला शांती मिळेल. त्याच बरोबर ब्राह्मणांना भोजन देवून दान धर्म करावा व जरूरत मंदना काळे तीळ, दही, दूध, वस्त्र, फळ व अन्न दान करावे.
पती-पत्नी मधील संबंध सुधारण्याचे उपाय:
सोमवती अमावस्याच्या दिवशी पती-पत्नी मधील संबंध सुधारण्यासाठी संपूर्ण दिवस उपवास करावा. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिव व माता पार्वती ह्यांची विधी पूर्वक पूजा करावी. त्यामुळे सौभाग्याची प्राप्ती होऊन वैवाहिक जीवन सुखी होऊन मधुरता येते.