Tasty Spicy Capsicum Bhaji For Kids Tiffin New Recipe In Marathi
टेस्टि स्वादिष्ट शिमला मिरची (ढबू मिरची) भाजी मुलांच्या डब्यासाठी मिनिटात संपेल डब्बा
शिमला मिरचीची भाजी ही सर्वाना म्हणजेच लहान असो किंवा मोठे असो आवडते. शिमला मिरचीची भाजी आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवतो. आज आपण अशीच नवीन प्रकारे शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत.
The Tasty Spicy Capsicum Bhaji For Kids Tiffin New Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Spicy Capsicum Bhaji / Shimla Mirchi Chi Bhaji
ढबु मिरचीची भाजी बनवताना आपण उभी चिरली आहे तसेच कांदा सुद्धा उभा चिरून घेतला. मग तीळ, सुके खोबरे व शेंगदाणे सुद्धा भाजून कुटून घेतले त्यामुळे भाजीला खूप छान चव येते.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
2 मोठ्या आकाराच्या शिमला मिरच्या
1 मध्यम आकाराचे कांदे (उभे पातळ चिरून)
2 टे स्पून लाल मिरची पावडर
1 टे स्पून तीळ
1 टे स्पून सुके खोबरे (किसून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून आमचूर पावडर
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
कृती: शिमला मिरची धुवून उभी चिरून घ्या. कांदा सोलून उभा पातळ चिरून घ्या. शेंगदाणे भाजून सोलून घ्या. सुके खोबरे किसून घ्या.
एका पॅनमध्ये तीळ फक्त गरम करून घ्या, सुके खोबरे सुद्धा थोडसे गरम करून बाजूला काढून ठेवा. आता शेंगदाणे व तीळ थोए जाडसर कुटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी. जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घालून 2 मिनिट मंद विस्तवावर गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये कडीपत्ता पाने, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या.
मग त्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालून मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिट मंद विस्तवावर भाजी शिजवून घ्या. मधून मधून झाकण काढून भाजी हलवून परत झाकण ठेवा.
शिमला मिरची शिजल्यावर त्यामध्ये कुटलेले शेंगदाणे घालून भाजी एकसारखी मिक्स करून घ्या. 1-2 मिनिट मंद विस्तवावर भाजी परतून घ्या.
आता आपली शिमला मिरचीची भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे, चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.