माघी गणेश जयंती 2025 पूजा मुहूर्त मंत्र व उपाय सर्व मनोकामना पूर्ण होतील
Maghi Ganesh Jayanti 2025 Pujavidhi, Mantra And Upay In Marathi
गणेश जयंती ही भगवान श्री गणेश ह्यांच्या जन्म दिवस म्हणून साजरी केली जाते. पंचांग अनुसार माघ महिन्यात दर वर्षी शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी साजरी करतात. ह्यादिवशी विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
हिंदू धर्मच्या मान्यता अनुसार कोणते सुद्धा शुभ कार्य भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा करून मगच करतात. म्हणूनच भगवान गणेश प्रथम पूज्य देवता मानले जातात. गणेश जयंतीलाच माघी गणेश जयंती ह्या नावानी ओळखले जाते. त्याच बरोबर ह्या तिथीला व्रत केले जाते.
गणेश जयंती पूजाविधी मुहूर्त व विधी:
माघ महिन्यात शुल्क पक्ष चतुर्थी 01 फेब्रुवरी 2025 शनिवार सकाळी 11 वाजून 38 मिनिट सुरू होत असून तिथी समाप्ती 2 फेब्रुवरी सकाळी 9 वाजून 14 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून श्री गणेश जयंती 1 फेब्रुवरी 2025 शनिवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
गणेश पूजा मुहूर्त: सकाळी 11 वाजून 38 मिनिट पासून दुपारी 01 वाजून 40 मिनिट पर्यन्त
श्री गणेश पूजन विधी:
सकाळी लवकर उठून श्री गणेशजीनचे ध्यान लावा मग स्नान करून चौरंगवर हिरवे वस्त्र अंथरूण त्यावर श्री गणेशजीनची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. मग गणेश जीनच्या मूर्ती ला पंचामृतनी स्नान घाला. मग तुपाचा दिवा व अगरबत्ती लावा. मग फूल, रोली, दूर्वा, सुपारी, फळ व मिठाई अर्पित करा. फूल अर्पित करताना लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करा. मग अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र, आरती म्हणून प्रसाद वाटा.
श्री गणेश जीचे सटीक मंत्र:
॥ ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥
|| श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥
॥ ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥
‘इदं दुर्वादलं ॐ गं गणपतये नमः’
ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा।

श्री गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय:
1. आपले कोणते सुद्धा महत्वपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी गणेश जयंती ह्या दिवशी वीड्याचे पान घेऊन त्यावर लवंग ठेवून ते मुडपून पूजेच्या थालीमध्ये पूजा करताना ठेवा. मग विडयाच्या पानाचा विडा गणेश भगवान ह्यांच्या जवळ ठेवून त्या समोर दिवा आगरबती लाऊन झेंडूचे फूल अर्पित करा. त्याच बरोबर प्रसाद म्हणून गूळ किंवा मोदक ठेवा.
2. आपण जर जास्त कष्ट सहन करीत असाल तर केळ्याचे पान घेऊन त्यावर अक्षता व रोली ठेऊन त्याचा त्रिकोण बनवून त्याच्या समोर दिवा व आगरबती लावा. मग पानाच्या मधोमध मसूर डाळ व लाल मिरची पावडर आगीत टाकून जाळण्याने आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व परेशानी दूर होतील.
3. श्री गणेशजीनची पूजा अर्चा करताना भगवान गणेश ह्यांच्या समोर बसून श्री गणेश मंत्र जाप करा. असे केल्याने जीवनातील सर्व बाधा दूर होऊन सुख-0 समृद्धी प्राप्त होईल.
4. आपली थांबलेली कामे पूर्ण करण्यासाठी गणेशजीनचे आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांना दूर्वा अर्पित करणे शुभ मानले जाते. दूर्वा अर्पित करताना नेहमी दूर्वा गणेश जीनच्या डोक्यावर ठेवा. असे केल्याने सर्व कार्य सिद्धी होऊन दुख दूर होतात.
5. गणेश जीनची पूजा करताना दूर्वाच्या बरोबर तीळ व तिळाचे पदार्थ अर्पित करा. असे म्हणतात की भगवान गणेशजिना दूर्वा अर्पित केल्याने सर्व समस्या दूर होतात व जीवनात कोणत्यासुद्धा बाधा येत नाहीत.