14 जानेवारी 2025 मकर संक्रांती दान पुण्य, मुहूर्त, महत्व, रंग, वाहन संपूर्ण माहिती
आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेचा
Makar Sankranti 2025 Shubh Muhurat Mahatva Rang And Wahan Sampurn Mahiti In Marathi
मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा नवीन वर्षातील पहिला व विशेष महत्वाचा सण आहे. मकर संक्रांती हा सण दरवर्षी येतो. मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे महत्वाचे मानले जाते.
जेव्हा सुद्धा सूर्य मकर राशीमद्धे जातो तेव्हा मकर संक्रांती हा सण येतो. भारतात विविध प्रांतात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. तसे पाहायला गेलेतर वर्ष भरात 12 संक्रांती येतात पण मकर संक्रांती हा सण विशेष साजरा केला जातो.
The Makar Sankranti 2025 Shubh Muhurat Mahatva Rang And Bahan Sampurn Mahiti In Marathi can be seen on our You tube Chanel Makar Sankranti 2025
मकर संक्रांती कधी आहे?
पंचांग अनुसार सूर्य 14 जानेवारी 2025 सकाळी 8 वाजून 55 मिनिटला धनू राशी मधुन मकर राशी मध्ये प्रवेश करीत आहे. म्हणून मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 मंगळवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
मकर संक्रांती 2025 दान पुण्य शुभ मुहूर्त?
14 जानेवारी 2025 सकाळी 7 वाजून 15 मिनिट पासून दुपारी 1 वाजून 25 मिनिट पर्यन्त उत्तम मुहूर्त आहे.
ब्रह्म मुहूर्त सकाळी 5 वाजून 27 मिनिट पासून 6 वाजून 21 मिनिट पर्यन्त स्नान दान पुण्य साठी
अमृत चौघडिया मुहूर्त सकाळी 7 वाजून 55 मिनिट पासून 9 वाजून 29 मिनिट पर्यन्त
मकर संक्रांती च्या अगोदर 13 जानेवारी 2025 सोमवार भोगी हा सण आहे त्यादिवशी तीळ घालून भाकरी करतात व भोगीची भाजी करतात.
मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 मंगळवार ह्या दिवशी आहे तेव्हा तिळाचे पदार्थ बनवले जातात व तीळ गुळाचे लाडू वड्या वाटून तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात.
मकर संक्रांतीच्या पुढचा दिवस 15 जानेवारी 2025 बुधवार किंक्रांत हा आहे ह्या दिवशी करीदिन असे सुद्धा म्हणतात ह्या दिवशी कोणते सुद्धा शुभ किंवा चांगले काम करीत नाहीत.
मकर संक्रांतीचे महत्व:
मकर संक्रांतीचे महत्व खूप आहे. महाभारतच्या काळामध्ये जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या शैय्या वर झोपले होते तेव्हा त्यांनी आपले प्राण मकर संक्रांती पर्यन्त थांबवून ठेवले होते. त्यांनी त्यांचे प्राण उत्तरायण पर्यन्त थांबवून ठेवले होते. मग मकर संक्रांती च्या दिवशी त्यांनी आपले प्राण त्यागले होते. गीतामध्ये असे सांगितले आहे की जो कोणी व्यक्ति मकर संक्रांती म्हणजे उत्तरायण च्या सहा महिन्यात शुक्ल पक्ष तिथीला देह त्याग केलातर ती व्यक्ति जन्म मरणच्या चक्र मधून मुक्त होतो त्यांना मोक्ष प्राप्ती होते.
त्याच बरोबर ह्या दिवशी सूर्य आपले पुत्र शनिदेवची राशी मकर ह्यामध्ये पूर्ण एक महिना राहतो. सूर्य व शनि ह्यांच्या मध्ये शत्रुता आहे पण ह्या दिवशी पिता व पुत्र ह्यांचे मिलन होते त्यामुळे त्याचे महत्व आहे.
मकर संक्रांत कशा वर आहे?
मकर संक्रांती ह्या वर्षी वाघ असून उपवह्न घोडा आहे. पूर्वे कडून पश्चिम ह्या दिशेला जात असून वायव्य दिशेस पहात आहे. हातात गदा आहे, केशरचा टिळा लावला आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. वासा करिता जुईचे फूल घेतले आहे. मोत्याचे अलंकार परिधान केले आहेत.
मकर संक्रांती कोणता रंग वर्ज:
मकर संक्रांती ह्यादिवशी पिवळा रंग वर्ज आहे. ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा परिधान करू नयेत.
पिवळा रंग सोडून आपण हिरवा किंवा लाल रंग परिधान करू शकता. हिरवा रंगाचे कपडे व बांगड्या परिधान करू शकता. तसेच जुईचे फूल ह्या दिवशी वर्ज आहे आपण जुईचे फूल सोडून दुसरे कोणते सुद्धा फूल वापरू शकता. सोन्याचे पिवळे दागिने घालू शकता पण मोत्याचे दागिने घालू नयेत.
मकर संक्रांती ह्या दिवशी 5 वस्तूंचे दान केल्यास भाग्यामध्ये वृद्धी होते:
मकर संक्रांती ह्या सणाला खिचडीचा सण असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी खिचडी बनवण्याची परंपरा आहे. ज्योतिष शास्त्रा नुसार 5 वस्तूचे दान केल्यास कुंडलीमधील दोष, बाधा जाऊन आर्थिक समस्या पासून मुक्ती मिळते.
खिचड़ीचे दान:
मकर संक्रांती ह्या दिवशी उडीदडाळची खिचडीचे दान करतात. त्यामुळे भाग्यमध्ये वृद्धी होते व शनिदेव प्रसन्न होतात.
गुळाचे दान:
मकर संक्रांतीला खिचडी बरोबर गूळ दान करणे शुभ मानले जाते. जर आपण मनोभावे गूळ दान केलातर भगवान सूरीदेव प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद मिळून आत्मविश्वासा मध्ये वृद्धी होते.
काळे तीळ दान करावे:
मकर संक्रांत ह्या दिवशी काळे तीळ दान करावे. तसेच पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्य भगवान ह्यांना अर्ध्य द्यावे त्यामुळे ते प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात.
वस्त्र दान करावे:
ज्योतिष शास्त्रा नुसार जीवनात वस्त्र दान करणे सर्वात जास्त महत्व पूर्ण आहे. मकर संक्रांती च्या दिवशी जरूरतमंद लोकांना वुलनचे कपडे दान करणे चांगले मानले जाते त्यामुळे कुंडलीमधील शनि व राहू दोष समाप्त होतात. तसेच कोणत्या सुद्धा कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात.
तूप व कंबलचे दान:
मकर संक्रांती ह्यादिवशी संक्रांती योग आहे त्यामुळे तूप व कंबल दान करणे शुभ मानले जाते. तसेच लक्ष्मी माता प्रसन्न होते व शुभ फळ प्राप्त होतात.
मकर संक्रांती व काळा रंगाचे महत्व:
मकर संक्रांती हा एकच सण असा आहे की ह्या सणाला काळा रंग आवर्जून वापरला जातो. ह्या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हळद-कुंकू करतात. मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यन्त हली-कुंकू आयोजित केले जाते. तेव्हा सौवाष्ण महिलांना बोलवतात. ह्या दिवशी काळे कपडे परिधान करतात कारणकी हिवाळा सीझन आहे व थंडी जास्त असते व काळा रंग हा उबदार आहे. नवीन लग्न
झालेली नवी नवरी व नवीन बाळाला सुद्धा काळे कपडे परिधान करायला देतात. काळ्या रंगावर तिळाचे दागिने उठून दिसतात. जन्म भर आपल्या संसारात गोडवा राहावा म्हणून लग्न झाल्यावर पहिल्या संक्रांती हलव्याचे दागिने घालतात व लहान मुलांचे बोरणहान करतात.