वर्षातील पहिली मौनी अमावस्या 2025 कधी आहे? महाकुंभ आहे काय करावे? कोणत्या झाडाची पूजा करावी पापांचा होईल नाश 144 वर्षा नंतर हा संयोग येत आहे
Mauni Amavasya 2025 Full Information In Marathi
29 जानेवारी ह्या दिवशी मौनी अमावस्या आहे ह्या दिवशी करोडो भक्त गंगा स्नान करतील. आता महाकुंभ मेला चालू आहे तर गंगा स्नान करण्याचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होईल.
उत्तर प्रदेश मध्ये 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेला चालू झाला असून 26 फेब्रुवारी 2025 पर्यन्त चालू रहाणार आहे. 26 फेब्रुवारी ह्या दिवशी महाशिवरात्री आहे त्यादिवशी शेवटचे स्नान आहे. मग महाकुंभ मेला समाप्त होणार आहे. 144 वर्षा नंतर हा संयोग येत आहे. तसेच 29 जानेवारी ह्या दिवशी मौनी अमावस्या असून ह्या दिवशी शाही स्नान होणार आहे.
करोडो जन्माच्या पापांचा नाश होणार:
मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 बुधवार ह्या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभ मेला मध्ये शाही स्नान करणे खूप महत्वपूर्ण असून अमृत स्नान मानले जाणार आहे. त्यामुळे सर्व पापांन पासून मुक्ती मिळेल.
कोणत्या जागी स्नान करावे:
पवित्र नदीच्या सांगमावर स्नान करणे करणे शुभ मानले जाते त्यामुळे सुखद फळ प्राप्त होते व त्याच बरोबर शांती मिळते. महाकुंभमध्ये अमृत स्नान करणे महत्वपूर्ण आहे.
मौनी अमावस्याच्या दिवशी खास योग आहे:
मौनी अमावस्या ह्या दिवशी श्रवण नक्षत्र च्या बरोबर सिद्धी व वज्र योग आहे. त्यामुळे ह्या दिवसाचे महत्व जास्त आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी पितरांना तर्पण व श्राद्ध केल्याने पितृ दोषा पासून मुक्ती मिळते. त्याच बरोबर पितरांचा आशीर्वाद मिळतो.
दान करण्याचे महत्व:
मौनी अमावस्याच्या दिवशी दानधर्म करणे विशेष महत्वाचे आहे. ह्या दिवशी गरीब व जरूरतमंद लोकांना अन्न दान व गरम कपडे दान करावे.
मौनी अमावस्याच्या दिवशी कोणत्या झाडांची पूजा करावी:
मौनी अमावस्या ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे, दान धर्म करावा त्याच बरोबर काही पवित्र झाडांची पूजा करणे महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात.
हिंदूधर्मामध्ये तुळशीचे खूप महत्व आहे. मौनी अमावस्याच्या दिवशी तुळशीच्या रोपांची पूजा जरूर करावी व तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावावा. तसेच तुळशीच्या रोपाला लाल रंगाचा दोरा जरूर बांधावा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व परेशानी दूर होतील. आपण ह्या दिवशी दुधामध्ये थोडे पाणी मिक्स करून तुळशीला अर्पित करू शकता त्यामुळे प्रभु श्रीहरी व लक्ष्मी माताची कृपा मिळेल व आपले पितर सुद्धा खुश होतील.
मौनी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. कारणकी पिंपळाच्या झाडांच्या मध्ये भगवान विष्णु, भगवान शिव व भगवान ब्रह्मा ह्याचा वास असतो. ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दूध अर्पित करून 7 प्रदक्षिणा माराव्या व आपल्या पितरांचे स्मरण करून तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावावा
मौनी अमावस्याच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणे लाभदायक आहे. ह्या झाडामद्धे भगवान शिव ह्यांचा वास आहे, ह्या दिवशी बेलाची पूजा अर्चा करून पाणी घालावे. त्यामुळे साधकाच्या जीवनात चांगले बदल घडून येतील तसेच ह्या दिवशी बेलाचे झाड घरात लावणे शुभ मानले जाते. आपण मंदिराच्या जवळपास सुद्धा हे झाड लावू शकता.