सरस्वती पूजन बसंत पंचमी 2025 कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, मंत्र व पूजालाभ काय आहे
Saraswati Pujan Basant Panchami 2025 Information In Marathi
माता सरस्वती तीन देवीमधील म्हणजे लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा मधील एक आहे. जी शिक्षण, ज्ञान व कलाची देवी आहे. बसंत पंचमी ह्या दिवशी 2 फेब्रुवारी ला सरस्वती माताची पूजा करायची आहे. बसंत पंचमी ह्या दिवशी मुहूर्तावर पूजा अर्चा करून मंत्र जाप केल्यास लाभ होतो. हिंदू धर्मामध्ये सरस्वती माताला ज्ञान, संगीत, कला व वीणाची देवी मानले जाते.
माता सरस्वतीचे दिव्य स्वरूप कसे आहे:
माता सरस्वती नेहमी कमळाच्या फुलावर किंवा हंसावर विराजमान असलेली आपण पाहतो. कमळ हे शुद्धता व ऊर्जाचे प्रतीक आहे व हंस हे ज्ञान व विवेकचे प्रतीक मानले जाते. सरस्वती माताला पांढरा रंग अतिप्रिय आहे. म्हणून सरस्वती माता नेहमी पांढरे वस्त्र परिधान करताना दिसते. जे पवित्रता व शांतताचे प्रतीक आहे. माता सरस्वती च्या हातात वीणा आहे जे संगीतचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच माता सरस्वती कला व सौन्दर्यची देवी मानले जाते. तीच्या दुसऱ्या हातात पुस्तक आहे जे ज्ञानचे प्रतीक आहे व विद्या व शिक्षाची देवी आहे.
माता सरस्वती मंत्र:
‘ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं सरस्वत्यै नमः’ हा सरस्वती माताचा प्रसिद्ध मंत्र आहे. ह्या मंत्राचा जाप केल्याने माता सरस्वती ज्ञान, बुद्धी, कला व सौन्दर्यची प्राप्ती होते.
माता सरस्वतीला नमस्कार करताना ‘ॐ सरस्वत्यै नमः’ हा मंत्र म्हणतात. हा मंत्र सुद्धा शक्तिशाली मंत्र आहे. माता सरस्वतीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे फूल किंवा पिवळ्या रंगाचे फूल नसेलतर पांढरे किंवा लाल रंगाचे फूल, मिठाई व धूपचा उपयोग केला जातो.
सटीक मुहूर्तवर पूजा केल्याने महालाभ होईल:
हिंदू धर्मामध्ये ग्रह व नक्षत्रची स्थिति कोणते सुद्धा काम करताना पाहिली जाते. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. तसेच माता सरस्वतीची पूजा शुभ मुहूर्तवर पूजा केल्याने आपले जीवन संपन्न होईल व माता सरस्वती प्रसन्न होईल. आपल्या मनासारखे ज्ञान व समृद्धी मिळते.
सरस्वती पूजा 2025 सटीक मुहूर्त:
बसंत पंचमी 2 फेब्रुवारी 2025 साजरी करायची आहे. बसंत पंचमी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिट ला सुरू होत असून 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिट पर्यन्त आहे.
सरस्वती पूजासाठी मुहूर्त सकाळी 7 वाजून 09 मिनिट पासून दुपारी 12 वाजून 35 मिनिट पर्यन्त आहे. तसेच ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे.