वास्तु टिप्स: नवीन वर्ष 2025 कॅलेंडर घरात लावण्याची योग्य जागा जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावले तर काय होते
Vastu Tips: New Year Calendar 2025 Where To Hang In Marathi
आपण आपल्या घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर लावत आहोत, तर आपण पुढे दिलेल्या काही टिप्स लक्षात घ्याव्यात, त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होईल.
वास्तु शास्त्रा नुसार घरात कोणती सुद्धा वस्तु घेताना योग्य रितीने ठेवणे व योग्य दिशेला ठेवणे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येवून सुख-शांती, समृद्धी येवू शकते. नवीन वर्षाची सुरवात करताना आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणतो. पण त्याची योग्य दिशा लक्षात घेणे महत्व पूर्ण आहे. कारण की नवीन वर्षाची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होते.
The Vastu Tips: New Year Calendar 2025 Where To Hang In Marathi can be seen on our You tube Chanel Vastu Tips: New Year Calendar 2025 Where To Hang
घरातील जुने कॅलेंडर काढून ठेवा:
नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना घरातील जुने कॅलेंडर काढून टाकणे खूप जरुरीचे आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरवात करणे व जुने कॅलेंडर ठेवणे म्हणजे जुन्या आठवणी लक्षात येणे. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जाचे कारण बनू शकते.
मागील वर्षातचे कॅलेंडर घरात कुठे सुद्धा ठेवू नये किंवा नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या मागे लावू नये.
घरातील जुन्या कॅलेंडरवर कोणत्या सुद्धा देवाचे चित्र असेलतर टाकून न देता नदीमध्ये विसर्जित करावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जाच्या प्रभावानी आपण वाचू शकतो.
घरात नवीन वर्षांचे कॅलेंडर लावावे:
वास्तु शास्त्रा नुसार नवीन कॅलेंडर पश्चिम दिशेला लावणे चांगले मानले जाते. पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह चांगला होतो. तसेच आपली आर्थिक स्थिति सुद्धा अजून चांगली होण्यास मदत होते.
उत्तर दिशा सुद्धा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य दिशा मानली जाते. कारणकी ही दिशा भगवान कुबेर ह्यांची मानली जाते. आपल्याला माहिती आहेच भगवान कुबेर हे धन व समृद्धीचे देवता आहेत.
कोण कोणत्या दिशा नवीन कॅलेंडर लावण्यास वर्ज आहेत:
घरातील काही दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावल्यास त्यामुळे वास्तु दोष होऊ शकतो, तसेच त्यामुळे घरातील व्यक्तिची प्रगती होण्यास अडचणी येवू शकतात म्हणून पुढे दिलेल्या दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य नाही.
घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नये. कारण की त्यामुळे आर्थिक नुकसान होऊन आरोग्याच्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात.
नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे किंवा खिडकीच्या जवळ किंवा मुख्य दरवाजा च्या जवळ लावू नये. कारणकी त्यामुळे परिवारातील सदस्याचे प्रगती होत नाही व नकारात्मक येते.
आपण जर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्याच्या वेळी काही वास्तु टिप्स लक्षात घेतल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा येऊन सुख-शांती व समृद्धी येते.