16 फेब्रुवरी 2025 रविवार द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी व्रत तिथी मुहूर्त महत्व व मनोकामना पूर्ति उपाय
Dwijapriya Sankashti Chaturthi 2025 Full Information In Marathi
माघ महिन्यातील कृष्ण पक्ष संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची द्विजप्रिय ह्या रूपाची पूजा अर्चा केली जाते.
हिंदू धर्मा मध्ये संकष्टी चतुर्थीच्या व्रताला विशेष शुभ महत्व असून फलदायी मानली जाते. ह्या व्रताचा अर्थ “संकटा पासून मुक्ती”. प्रतेक महिन्यात दोन वेळा चतुर्थी येते एक म्हणजे शुल्क पक्ष विनायक चतुर्थी व दुसरी म्हणजे कृष्ण पक्ष संकष्टी चतुर्थी असे त्याचे रूप आहे. हे व्रत श्रद्धेने केले जाते त्यामुळे आपल्या जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी महत्व:
माघ महिन्यात कृष्ण पक्ष संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. भगवान गणेश ह्यांच्या द्विजप्रिय स्वरूपची पूजा केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार हे व्रत केल्याने भगवान गणेश ह्यांची कृपा प्राप्त होऊन जीवनातील सर्व बाधा दूर होतात.
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी 2025 व्रत तिथि व शुभ मुहूर्त:
व्रत तिथि- 16 फेब्रुवरी 2025 रविवार
चतुर्थी तिथि प्रारंभ- 15 फेब्रुवरी 2025, रात्री 11:52 पासून
चतुर्थी तिथि समाप्त- 17 फेब्रुवरी 2025, रात्री 2:15 पर्यन्त
चंद्रोदय वेळ: – 16 फेब्रुवरी, रात्री 9:51 वाजता
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांचे व्रत संपूर्ण दिवस ठेवून चंद्र दर्शन झाल्यावर आरती करून मग व्रत सोडतात.
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी व्रत पूजाविधि:
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत संकल्प करावा.
पूजा घर साज करून गणेश भगवान ह्यांची मूर्ती स्थापित करावी.
भगवान गणेश ह्यांना गंध, अक्षता, फूल, धूप, दीप दूर्वा रोली, अर्पित करावे. मग मोदक व पंचामृत दाखवावे.
“ॐ गं गणपतये नमः” मंत्र जाप करा.
आरती व नेवद्य दाखवल्या नंतर गणेश चालीसाचे वाचन करावे. भगवान गणेश ह्यांच्या आवडतिचे लाडू व मोदक अर्पित करावे.चंद्र दर्शन झाल्यावर व्रत सोडावे.

संकष्टी चतुर्थी व्रत केल्याचे लाभ:
जीवनातील सर्व कष्ट संकट दूर होतात.
सुख-समृद्धि, सौभाग्य व धन प्राप्ति होते.
दांपत्य जीवनामद्धे मधुरता येते.
विद्यार्थिची बुद्धी व विद्यामध्ये वृद्धी होते.
सर्व कार्यामधील बाधा नष्ट होतात.
परिवारीक जीवनात सुख-शांतीसाठी घरात गणेश भगवान ह्यांची चांदीची मूर्ती स्थापित करा. त्याच बरोबर गणेश भगवान ह्यांना 5 हळकुंड अर्पित करा.
चतुर्थीच्या दिवशी आपल्या जीवनात सुख समृद्धी व आर्थिक समस्याच्या मुक्तीसाठी 5 किंवा 11 दूर्वाची जुडी बांधून लाल रंगाच्या कापडात बांधून गणेशजींना अर्पित करा.
आपल्या घरात आंनदी वातावरण येण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरूरतमंदना अन्न, वस्त्र व धन दान करावे.