महाशिवरात्री 2025 मुहूर्त विधी मंत्र सटीक उपाय व घरात कोणत्या धातूचे शिवलिंग असावे
Mahashivratri 2025 Muhurth Pujavidhi Mantra Upay In Marathi
महशीवरात्रीच्या दिवशी शिवभक्त श्रद्धा व विश्वासाने व्रत करून विधी पूर्वक शिव-पार्वतीची पूजा करतात. आता आपण पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा मुहूर्त पाहूया.
26 फेब्रुवरी 2025 बुधवार ह्या दिवशी महाशिवरात्री आहे. शिवपुराणच्या नुसार ब्रह्मा, विष्णु ह्यांचा वाद शांत करण्यासाठी शिव शिवलिंगच्या रूपात प्रकट झाले होते. ज्या दिवशी ही घटना झाली तो दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी होती. म्हणूनच ह्या दिवशी महाशिवरात्री हा दिवस साजरा करतात. ह्या दिवशी प्रतेक शिव मंदिरात विशेष पूजा करून व्रत केले जाते.
महाशिवरात्री ह्या दिवशी भगवान भोलेनाथ पृथ्वी वरील शिवलिंगमध्ये विराजमान होतात. त्यामुळे ह्या दिवशी शिव उपासना केल्याने उत्तम फळ प्राप्त होते. ह्या दिवशी सर्वजण प्रभु की पूजा अर्चना करतात. बरेच लोक आपल्या घरात रुद्राभिषेक करतात. भगवान भोलेनाथ बऱ्याच वेळवेगल्या पद्धतीने केली जाते. पण महाशिवरात्री ह्या दिवशी शिवभक्त बेलपत्रनी भगवान शिव ह्यांची पूजा केल्याने त्यांच्या धना संबंधित सर्व अडचणी दूर होतात.
महाशिवरात्रि तिथि:
पंचांग नुसार कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीची सुरुवात 26 फेब्रुवरी सकाळी 11 वाजून 08 मिनिट पासून सुरू होत असून समाप्ती 27 फेब्रुवरी सकाळी 8 वाजून 54 मिनिट होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निशा काळ मध्ये भगवान शिव ह्यांची पूजा केली जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयच्या अगोदर भगवान शिव ह्यांची पूजा केली जाते किंवा सूर्यास्तच्या नंतर केली जाते. ह्या वेळी केलेली साधना विशेष महत्वाची मानली जाते. प्रतेक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. पौराणिक मान्यता अनुसार चार प्रहार म्हणजे यथा श्रद्धा, यथा प्रहर, यथा स्थिति व यथा उपचार असे आहेत. त्यानुसार साधना केली जाते. चार प्रहर मधील साधनाने धन, यश, प्रतिष्ठा व समृद्धी प्राप्त होते. ज्यांच्या जीवनात संतान संबंधित बाधा येत आहे त्यांनी ही साधना नक्की करावी.
चार प्रहर पूजेची वेळ:
प्रथम प्रहरची वेळ: संध्याकाळी 6:19 टे रात्री 9:26 पर्यन्त
दूसरा प्रहरची वेळ: रात्री 9:26 मिनिट पासून मध्य रात्री 12: 34 पर्यन्त
तिसरा प्रहरची वेळ: मध्यरात्री 12:34 पासून 27 फेब्रुवरी पहाटे 03:41 पर्यन्त
चौथा प्रहरची वेळ: 27 फेब्रुवरी सकाळी 03:41 पासून सकाळी 06:48 पर्यन्त
महाशिवरात्रि दुर्लभ संयोग:
पंचांग अनुसार कृष्ण पक्ष तिथी महाशिवरात्री 26 फेब्रुवरी बुधवार ह्या दिवशी घनिष्टा नक्षत्र, परीघ योग, शकुनी करण व मकरराशीच्या चंद्रच्या उपस्थित येत आहे. ह्या दिवशी चार प्रहरमध्ये साधना केल्याने भगवान शिव ह्यांची कृपा प्राप्त होते. ह्या दिवशी शिव मंदिर मध्ये सकाळ पासूनच भक्तांची गर्दी चालू होते. शुभ संयोग व शुभ मुहूर्त मध्ये भगवान शिव ह्यांची आराधना केल्यास मनोवांछित फळ प्राप्त होते.
पूजा करताना महामृत्युंजय मंत्र जाप करा त्यामुळे विशेष कृपा प्राप्त होऊन सुख-शांती टिकून राहते.

महामृत्युंजय मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।
भगवान शिव ह्यांच्या अभिषेक करताना पुढील वस्तु वापरा:
1) मध वापरुन अभिषेक करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनातील येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. व भगवान शिव ह्यांची कृपा मिळते.
2) भगवान शिव ह्यांचा रुद्रभिषेक दही वापरुन करा. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.
3) भगवान शिव ह्यांचा अभिषेक ऊसाच्या रसानी केलातर माता लक्ष्मी प्रसन्न होते.
4) भगवान शिव ह्यांच्या अभिषेक करताना 108 वेळा ॐ पार्वतीपतये नम: म्हणावा. असे केल्याने जीवनात संकट येत नाहीत.
भगवान शिव ह्यांची पूजाविधी:
महाशिवरात्री ह्या दिवशी भगवान शिव ह्यांचा पंचामृतनी अभिषेक करा.
पाण्यामध्ये केसर घालून 8 लोटे पाणी घेऊन अभिषेक करावा व पूर्ण रात्र दिवा लावून ठेवावा.
चंदनाचा तिलक लावावा, बेलपत्र, भांग, धतुरा, उसाचा रस, तुळशीपत्र, जायफळ, कमळगट्टा, फळ, मिष्ठान, गोड पान, आत्तर व दक्षिणा ठेवा.
मग सर्वात शेवटी केशर घालून खीरीचा भोग ठेवावा मग प्रसाद म्हणून वाटावा.
घरात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगची स्थापना कशी करावी:
जे शिवभक्त शिव मंदिरमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांनी घरात शिवलिंगची स्थापना करून पूजा करावी. घरात शिवलिंगची स्थापना करायची असेलतर महाशिवरात्री हा दिवशी शुभ आहे. त्यासाठी लहान आकाराचे शिवलिंग आणावे कारणकी मोठ्या आकाराचे शिवलिंग मंदिरमध्ये स्थापित करतात.
शिव पुराणात असे सांगितले आहे की घरातील शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या पहिल्या पेरा पेक्षा मोठे असू नये. त्याच बरोबर श्री गणेश, माता पार्वती व कार्तिक स्वामीं व नंदीची पण प्रतिमा ठेवावी. शिवलिंग सोने-चांदी, पितळ, मातीचे किंवा दगडाचे शुभ मानले जाते. एल्युमीनियम, स्टील किंवा लोखंडी धातूचे शिवलिंग असू नये. आपण दुसऱ्या धातूचे किंवा स्फटिकचे सुद्धा शिवलिंग स्थापित करू शकता. शिव परिवाराची पूजा केल्यास त्याचे फळ लवकर मिळते.