शनि अमावस्या कधी आहे? पितृदोष शांतीसाठी रामबाण उपाय व सटीक मंत्र, मृत पूर्वजांचा मिळेल आशीर्वाद
Shani Amavasya 2025 Upay Mantra In Marathi
शनि आमवस्या 29 मार्च 2025 रोजी शनिवारी आहे. ह्या वर्षी चैत्र महिन्यात शनि अमावस्या आहे. ह्या दिवशी शनिची पूजा व काही उपाय केले जातात. त्यामुळे पितृ दोष पासून मुक्ती मिळेल. त्याच बरोबर शनिची अशुभ स्थिति, साडेसाती, ढैय्या साठी सुद्धा उपाय केले जातात. असे म्हणतात को शनि अमावस्याच्या दिवशी भगवान शनि ह्यांची पूजाअर्चा व मंत्र जाप केल्याने पितृदोषा पासून छूटकारा मिळेल. अमावस्याच्या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा महत्व आहे.
शनि अमावस्याच्या दिवशी पितृदोष दूर करण्याचे उपाय:
शनि अमावस्या 29 मार्च ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी शनीचे गोचर होणार आहे म्हणजेच बदलणार आहे. म्हणजेच मीन राशीमद्धे प्रवेश करणार आहे.
अमावस्या तिथीला पितृ भूतलावावर येतात असे म्हणतात. म्हणून आपल्याला एक चांगली संधि आहे की त्यांची करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदान, तर्पण व त्यांची पूजा करणे. शनि अमावस्याच्या दिवशी मंदिरमध्ये किंवा गरीब व्यक्तिला तिल दान करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर गाईला चारा व पक्षांना दाणे द्या त्यामुळे पितृदोष दूर होईल.
शनि देवाला कर्म व न्यायचे देवता मानले जातात. त्यामुळे ह्या दिवशी मनोभावे दान-पुण्य करा व सेवा भावे पितृपूजन केल्याने पितृदोष शांत होईल.
शनि अमावस्या पितृदोष शांती मंत्र:
ॐ तत्पुरुषाय विद्महे, महामृत्युंजय धीमहि, तन्नो पितृ प्रचोदयात् ह्या मंत्राचा जाप करा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय पितृ दोष निवारणाय स्वाहा मंत्र जाप करा.
ऊं पितृ देवतायै नमः मंत्र जाप करा.

शनि अमावस्याच्या दिवशी शनि ग्रह शांती उपाय:
शनि अमावस्याच्या दिवशी हनुमानजिच्या मंदिरात जाऊन उपासना करणे उत्तम मानले जाते.
हनुमान चालीसा, बजरंग बाण व सुंदरकांडचे वाचन करा.
पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लाऊन शनि मंत्र जाप केल्याने कुंडली मधील शनि ग्रह शांत होतो.
शनि देवाचा मंत्र ॐ शं शनैश्चराय नमः ह्या मंत्राचा जाप करू शकता.
शनि अमावस्याच्या दिवशी छायादान सुद्धा करू शकता. त्यासाठी एका थालीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहून ते तेल दान करावे. त्यामुळे शनि दोष दूर होतो. ह्या दिवशी जरूरतमंदना दान करणे शुभ मानले जाते.