30 सोप्या किचन टिप्स आईसाठी वेळ वाचेल व आई आपले छंद जोपासू शकेल
30 Amazing Kitchen Tips For Mother’s In Marathi
आपल्याला माहिती असेलच आपल्या आईचा दिवासातील किती वेळ किंवा तास स्वयंपाक घरात जातो. सकाळी उठल्या बरोबर चहा, कॉफी, दूध गरम करणे नाश्ता बनवणे किंवा डब्बा तयार करणे, मग दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक, मग दुपारचा चहा त्याबरोबर परत काहीतरी खायला बनवणे मग रात्रीचा स्वयंपाक करने मग सर्व किचन साफ करून मग झोपायला जाणे.
आई जेव्हा स्वयंपाक घरात असते तेव्हा तीच्या डोक्यात सारखे विचार असतात की कोणती भाजी करायची जी सर्वाना आवडेल, त्याच बरोबर स्वयंपाक करताना तो सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह पाहिजे व तो सर्वांना आवडला पाहिजे म्हणजे सर्वजण एकत्र बसून आनंदानी जेवतील.
आज आपण आपल्या आईसाठी 30 सोप्या किचन टिप्स पाहणार आहोत त्यामुळे तिचा स्वयंपाक घरातील वेळ कमी होऊन तिला आपल्या स्वतः साठी वेळ देता येईल.
30 किचन टिप्स:
1. कांदा कापताना डोळ्यात पाणी येते. तर कांदा कापण्याच्या अगोदर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा मग कांदा कापायला घ्या म्हणजे डोळ्यात पाणी येणार नाही.
2. समजा आमटीमध्ये मीठ जास्त झाले असे बऱ्याच महिलांचे गडबडीत होत असते. तर काय करायचे बटाटाचे तुकडे किंवा ब्रेडचे तुकडे किंवा गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे छोटे गोळे आमटीमध्ये अर्धातास ते 1 तास तसेच ठेवावे.मग काढून आमटी सर्व्ह करावी.
3. आपण पालक जेव्हा शिजवून घेतो, शिजल्यावर त्याचा रंग बदलतो. पालक शिजवून झाला की लगेच बर्फाच्या थंड पाण्यात 5 मिनिट ठेवावा त्यामुळे त्याचा रंग छान हिरवागार राहील.
4. जर समजा आपल्या जवळ बर्फाचे थंड पाणी नाही तर पालक किंवा मटर शिजवताना त्यामध्ये एक चिमूट सोडा घाला. त्यामुळे त्याचा हिरवागार रंग तसाच टिकून राहील.
5. आपल्याला राजमा किंवा छोले बनवायचे आहेत पण आपण रात्री भिजवायला विसरलो तर उकलते पाणी घेऊन त्यामध्ये राजमा व छोले टाकून लगेच झाकण ठेवून 2 तास तसेच ठेवावे. आपण राजमा किंवा छोले नेहमी भिजवून जसे बनवतो तसेच छान बनतात.
6. आपण अंडी उकडायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये थोडेसे मीठ घाला त्यामुळे अंड्याला क्रक्स येत नाहीत. तसेच अंडी उकडून झाल्यावर लगेच थंड पाण्यात घाला त्यामुळे योकचा रंग बदलत नाही.
7. जेव्हा आपण स्टीर फ्राय करता तेव्हा सुरवातीला जास्त तेल लागते. पण त्यापेक्षा असे करा की पॅनवर साहित्य टाकून बाजूनी थोडे थोडे तेल सोडा त्यामुळे जास्त तेल लागत नाही.
8. लिंबुचा रस काढताना लिंबू थोडा वेळ गरम पाण्यात घाला मग गरम पाण्यातून काढून फ्रीजमध्ये 2-5 मिनिट ठेवा त्यामुळे लिंबूरस जास्त प्रमाणात निघतो.
9. कॉलीफ्लॉवरची भाजी बनवताना त्याचा सुगंध चांगला येत नाही त्यासाठी त्यामध्ये एक ब्रेडची स्लाइस टाकावी त्यामुळे त्याचा वास येत नाही.
10. आपण करी बनवतो तेव्हा आपण मसाले भाजून घेतो. तेव्हा चांगला डार्क रंग येण्यासाठी मसाले भाजताना एक चिमूट साखर घाला.

11. आपण जेव्हा दूध आटवायला ठेवतो तेव्हा दूध ऊतू जाते मग खूप डोकेदुखी होते त्यासाठी दूध गरम करायला ठेवतानाच त्यामध्ये एक लाकडी मोठ्या दानड्याचा डाव ठेवावा.
12. कारले आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे पण सर्वांनाच कारल्याची टेस्ट आवडतेच असे नाही. कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी कापलेल्या कारल्याला मीठ लावून 20 मिनिट तसेच ठेवावे मग पाणी काढून कारले शिजवावे.
13. आपल्या हाताला मासे किंवा लसणाचा वास येत असेलतर त्यापासून छूटकारा मिळण्यासाठी कोणत्यासुद्धा स्टीलच्या भांड्यावर आपले हात चोळावे तरी सुद्धा वास गेला नाहीतर आपले हात सिंकवर घासावे.
14. आपण आपले शिजवलेले अन्न क्लिंग फिल्म किंवा एल्यूमीनियम फॉईलने झाकतो त्याआयवजी शॉवर कॅप ने जेवण झाकून ठेवू शकता. तसेच आपण शॉवर कॅप वापरुन झाल्यावर परत धुवून वापरू शकतो.
15. हिरवी मिरची आणलीकी तिचे देठ काढून मग मिरची न्यूज पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. बरेच दिवस चांगली राहते.
16. आपल्याला जर कच्चे फळ किंवा भाजी लगेच पिकवायची असेलतर पेपर बॅगमध्ये ठेवा न्यूज पेपरच्या इथाइलेने नावाच्या आल्मच्या संपर्कनी पिकण्याची प्रक्रिया लवकर होते.
17. आपल्याला माहिती असेलच केळी लवकर पिकवायची असलीतर केल्याच्या घडाला अलुमिनीय फॉईल पेपर ने गुंडाळा.
18. भाजीला ताजे ठेवण्यासाठी फ्रीजच्या स्टोरेज सेक्शनमध्ये कागदामद्धे किंवा मुलायम कापडात भाजी गुंडाळून ठेवा.
19. चीज केक किंवा पनीर सारखे नरम पदार्थ सुरीने कापण्या पेक्षा न्ट्ल फ़्लासने कापा छान कापले जातात.
20. केक कापताना प्रथम सूरी गरम पाण्यात बुडवून पुसून मग केक कापा.प्रतेक स्लाइस कापताना असे करा म्हणजे केक छान कापला जातो व चुरा होत नाही.
21. ब्राऊनी चवीला स्वादिष्ट लागते व ती कापताना तिचे मोठे छान तुकडे कापता यावेत त्यासाठी धातूच्या चाकूच्या आयवजी प्लॅस्टिक चाकू वापरा त्याचे छान पिसेस होतील.
22. मुलांना सँडविच हे निरनिराळ्या शेपमध्ये कापलेले आवडतात मग त्यासाठी चाकूच्या आयवजी पिझ्झा कटरचा उपयोग करून पाहिजे तो आकार कट करू शकता.
23. राहिलेला पिझ्झा किंवा नान उरला मग परत गरम केलातर त्याचा स्वाद बिघडतो. तो नरम राहून त्याची टेस्ट चांगली राहण्यासाठी पिझ्झा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करताना त्याच्या सोबत एका ग्लासमध्ये पाणी ठेवा त्यामुळे पिझ्झाची टेस्ट पहिल्या सारखीच राहते व तो कोरडा होत नाही.
24. आपल्या किचनमधील ड्रेनेज साफ करण्यासाठी उकलत्या पाण्यात बेकिंग सोडा घालून उकलते पाणी ड्रेनेजमध्ये टाका त्यामुळे ते पटकन साफ होते.
25. आपला कचऱ्याचा डब्बा चांगला राहण्यासाठी कचऱ्याचा डब्बा धुवून सुकवून त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकावा. तसेच ओल्या कचऱ्याच्या डब्यात न्यूज पेपट घालून ठेवावा त्यामुळे डब्याला वास येत नाही.
26. लाकडाचा चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी बेकिंग सोडा व व्हेनिगर मिक्स करून पूर्ण बोर्ड वर पसरवून 30 मिनिट तसेच ठेवावे. मग घासून धुवावा.
27. आपल्या चॉपिंग बोर्डवर कोणत्या साहित्याचे डाग पडले असतीलतर मीठ, पाणी व बेकिंग सोडाची पेस्ट बनवून ब्रशनी बोर्डवर लावावी सुकल्यावर बोर्ड धुवावा.
28. आपला ब्लेंडर साफ करताना त्यामध्ये निम्मे गरम पाणी भरून 2 थेंब डिश वॉशचे थेंब टाकावे मग 10-15 मिनिट तसेच ठेवावे. मग धुवावे.
29. आपला फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडर साफ करण्यासाठी लहान मुलांचा टुथ ब्रश वापरुन साफ करावे.
30. आपल्या स्टीलच्या उपकरणावर आपले फिंगर प्रिंट्स आहेत तर पेपर न्यपकिन व जवसाचे तेल वापरुन उपकरण पुसून घ्या.
आपला किचन मधील वेळ कमी करण्यासाठी एक सूचना आहे आठवडा भराचे टाइम टेबल करून त्याप्रमाणे तयारी करून ठेवा. भाज्या स्वच्छ करून चिरून ठेवा. लसूण सोलून ठेवा मग फ्रीज मध्ये हवाबंद डब्यात ठेवा, मासे साफ करून ठेवा, नारळ खोवून किंवा किसून ठेवा, दही लावून ठेवा, चटण्या बनवून ठेवा. अशी तयारी करून ठेवली की आपल्या वेळ नक्कीच वाचेल व आपल्याला आपले छंद जोपासता येतील.