चैत्र नवरात्री 2025 घटस्थापना, पूजा मुहूर्त, पूजा साहित्य व नियम कोणत्या दिवशी उपवास करावा
Chaitra Navratri 2025 Full Information In Marathi
हिंदू मराठी कॅलेंडर नुसार चैत्र महिन्या पासून नवीन वर्ष सुरू होते. ह्या वर्षी 30 मार्च 2025 रविवार रोजी चैत्र महिना सुरू होत असून ह्या दिवशी गुडी पाडवा आहे तसेच ह्या दिवसा पासून चैत्र नवरात्री सुरू होत आहे.
चैत्र नवरात्री 30 मार्च ते 6 एप्रिल 2025 पर्यन्त आहे. दरवर्षी चैत्र महिना शुल्क पक्ष प्रतिपदा तिथी रोजी चैत्र नवरात्रि सुरू होते. ह्या वर्षी 5 एप्रिल रोजी महाअष्टमी, 6 एप्रिल महानवमी आहे. ह्या दिवशी हवन व कन्या पूजन करायचे आहे. 7 एप्रिल रोजी देवी मातेला निरोप द्यायचा आहे. ह्या वर्षी रविवार ह्या दिवशी चैत्र नवरात्री सुरू होत आहे त्यामुळे माता दुर्गा हत्तीवर विराजमान होऊन येत आहे. जे समृद्धी व शांतीचे प्रतीक आहे. चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गाची पूजा अर्चा व व्रत केले जाते.
चैत्र नवरात्री कलश स्थापना कधी करावी?
चैत्र नवरात्री 30 मार्च रविवार रोजी रेवती नक्षत्र व एंद्र योगच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत आहे. कलश स्थापना च्या बरोबर हिंदू नवीन वर्षांची सुरुवात होत आहे.
पूजा मुहूर्त:
कलश स्थापना मुहूर्त सकाळी 6 वाजून 12 मिनिट ते सकाळी 10 वाजून 22 मिनिट पर्यन्त आहे.
अभिजीत मुहूर्त: 12 वाजून 1 मिनिट ते 12 वाजून 50 मिनिट पर्यन्त
पंचांग नुसार कलश स्थापना शुभ मुहूर्त सकाळी 6 ते दुपारी 2 वाजे पर्यन्त आहे.
कलश स्थापना साहित्य:
कलश स्थापना साठी चांगल्या प्रतीची माती, जवस, पाणी भरून कलश, मौली, इलायची, लवंग, कपूर, रोली, सुपारी, तांदूळ, कॉईन म्हणजेच नाणी, अशोक किंवा आंब्याच्या झाडाची 5 पाने, नारळ, ओढणी, कुंकु, फळ-फूल, हार, व शृंगार साहित्य
पहिल्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग असून शैलपुत्रिची पूजा, तिलक, व्रत व विद्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करायचे. चित्र नवरात्री 6 एप्रिल रोजी समाप्त होत असून महानवमी च्या बरोबर 7 एप्रिल रोजी विजयादशमी साजरी करायची आहे. महाअष्टमी व्रत 5 एप्रिल, महानवमी 6 एप्रिल व विजयादशमी 7 एप्रिलला आहे.
खर म्हणजे नवरात्री नेहमी 9 दिवसांची असते. पॅन ह्या वर्षी नवरात्री 9 दिवसांची आहे. नवरात्री मध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा अर्चा केली जाते. पॅन ह्या वर्षी 8 दिवस नवरात्री आहे कारणकी एक दिवस चतुर्थी तिथी आली आहे.

चैत्र नवरात्री नियम:
ज्यांना 9 दिवसाचे उपवास करणे शक्य नाही तर शास्त्रा नुसार 1 दिवसाचा किंवा 3 किंवा 5 किंवा 7 दिवसाचे किंवा 9 दिवसाचे उपवास करू शकता. नवरात्री मध्ये माता 9 दिवस जागी असते. किंवा अष्टमी किंवा नवमी सुद्धा उपवास करू शकता.
आपल्याला जे संभव आहे तेच करावे म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. गर्भवती महिलानी उपवास करू नये किंवा मासिक काळात सुद्धा उपवास करू नये.
सकाळी लवकर म्हणजे ब्राह मुहूर्तवर उठून पूजा अर्चा करावी, स्तविक भोजन करावे, ब्रह्मचर्य पालन करावे, वाद विवाद करू नये शांत रहा देवी माताचे मंत्र जाप करा घरामधून बाहेर जावू नये घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान करा.
चैत्र नवरात्रीमध्ये देवी माताची मनोभावे पूजा अर्चा करा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.