विस्मरणात गेलेली पारंपारिक कोबीची पचडी | कोबीची कोशिंबीर | कोबी सॅलड बनवा 5 मिनिटात
Kobichi Pachadi | Cabbage Salad | Kobichi Koshimbir Weight Loss Recipe In Marathi
कोबी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. कोबी मध्ये पोषक तत्व आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे जे आपली पंचनशक्ती मजबूत बनवते. कोबीच्यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात आहेत त्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. कोबी मध्ये पोट्याशीयम व एंटीऑक्सीडेंट आहेत. कॅन्सर होण्यापासून बचाव होऊ शकतो. रोग प्रतिकार शक्ति वाढते. कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. आपल्या हाडांचे स्वास्थ ठीक राहते.
आज आपण कोबीची पचडी म्हणजेच कोबीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. कोबीची कोशिंबीर बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. कोबीची पचडी आपण 5 मिनिटात बनवू शकतो. मुलांना डब्यात द्यायला पण छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम कोबी (पत्ताकोबी) Cabbage
1 टे स्पून लिंबूरस
1 टे स्पून साखर
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
2-3 हिरव्या मिरच्या चिरून

कृती: प्रथम कोबी धुवून मोठ्या भोकाच्या किसणीनी किसून एका मोठ्या आकाराच्या बाउल मध्ये काढून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. हिरव्या मिरच्या धुवून चिरून घ्या.
फोडणी करिता: एका फोडणीच्या वाटीत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून, मोहरी तडतडली की जिरे, हिंग, हळद व हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करून किसलेल्या कोबिवर घालून चवीने मीठ, लिंबूरस, साखर व चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
कोबीची पचडी किंवा कोबीची कोशिंबीर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.