सूर्य ग्रहण व शनि अमावस्या दुर्लभ संयोग काय करावे काय करू नये महत्वाचे नियम व उपाय
तुळशीचे उपाय जरूर करावे सकारात्मक ऊर्जा येईल
Shani Amavasya w Surya Grahan Kay Karawe Kay Nahi In Marathi
29 मार्च 2025 रोजी सूर्य ग्रहण व शनि अमावस्या ह्यांचा दुर्लभ संयोग येत आहे. ह्या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी काय करावे व काय करू नये .
29 मार्च 2025 रोजी पहिली शनि अमावस्या व पहिले सूर्य ग्रहण ह्यांचा विशेष संयोग बनत आहे. वैदिक ज्योतिष मध्ये ह्याचे विशेष महत्व आहे. कारण की ह्या दोन्ही घटना मानवी जीवनाशी निगडीत असून प्रभावी सुद्धा आहेत. हिंदू धर्मा नुसार ह्या दिवसाचे महत्व लक्षात घेतले तर त्याची शुभ फळ प्राप्त होऊन परेशानी पासून सुटका होते.
चला तर मग आपण पाहू या शनि अमावस्या व सूर्य ग्रहणच्या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी काय करावे:
शुभ फळ प्राप्त होण्यासाठी शनि अमावस्याच्या दिवशी पुढील कामे करू नका:
1. शनि अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे ह्या दिवशी गाय, कुत्रा व कावळा ह्यांना काही इजा होऊ नये म्हणून काळजी घ्या.
2. ह्या दिवशी रंग, छल, किंवा वाईट प्रकारे पैसा कामावला नाही पाहिजे. त्यामुळे शनि दोषांचा अशुभ प्रभाव कमी होतो.
3. शनि अमावस्याच्या दिवशी नख कापणे, केस कापणे किंवा चपाती कापणे अशुभ मानले जाते. नाहीतर आपल्याला त्रास उद्भवू शकतो.
4. ह्या दिवशी दारू व मांसाहारी जेवण सेवन करू नये. नाहीतर शनिदेवाच्या अशुभ प्रभाव होतो.
शनि अमावस्या व सूर्य ग्रहणच्या दिवशी हे सटीक उपाय करा:
1. शनि अमावस्याच्या दिवशी जरूरतमंद लोकांना भोजन, कपडे व तेल दान करा. धार्मिक मान्यता अनुसार शनिदेव प्रसन्न होतात.
2. शनि कृपा मिळण्यासाठी शनि अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे शुभ परिमाण मिळतील.
3. ह्या दिवशी हनुमान चालीसाचे वाचन करा त्यामुळे शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होईल.
4. सूर्य ग्रहण सुरू झालेकी मंत्र जाप सुरू करा त्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.
सूर्य ग्रहण वेळ:
वैदिक पंचांग नुसार ह्या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण 29 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजून 20 मिनिट पासून सुरू होत असून संध्याकाळी 6 वाजून 16 मिनिट पर्यन्त आहे. पण हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे आपण सूतक काळाचे नियम पाळू नयेत.

भारतात सूर्य ग्रहण दिसणार नसले तरी ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जाचा संचार होत असतो. तरी सुद्धा ह्या दिवशी आपण तुळशीचा उपाय केला पाहिजे व त्याचे काही नियम पाळले पाहिजेत.
तुळशीचे महत्व:
ग्रहण काळात तुळशीचे खूप महत्व आहे. ग्रहण काळात सूतक असते त्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते त्याचा परिमाण काही गोष्टीवर होत असतो. हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप पवित्र व पूजनीय मानले जाते. ग्रहण काळात आपण तुळशीची पाने आपल्या खाद्य पदार्थावर टाकून ठेवावीत त्यामुळे त्यावर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही. म्हणूनच ग्रहण काळात तुळशीचे खूप महत्व आहे.
ग्रहण काळात आपण तुळशीचे पाने सेवन केले पाहिजे कारण की ते आपल्या स्वास्थ्यच्या दृष्टीने लाभकारी आहे. सूर्य ग्रहण समाप्त झाल्यावर तुळशीचे पान जरूर सेवन करावे.
एक महत्वाची गोष्ट शनि अमावस्या व सूर्य ग्रहण एकाच दिवशी आहे त्यामुळे ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी चुकून सुद्धा घालू नका. किंवा तुळशीची पाने सुद्धा तोडू नका. नाहीतर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागेल. आपल्याला खाद्य पदार्थवर तुळशीचे पान ठेवायचे असेलतर एक दिवस अगोदरच पाने तोडून ठेवावीत.