श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सर्वात प्रभावी 11 दिवसांची सेवा केली तर वाईट दिवस लगेच संपतील
Shri Swami Samarth Prakat Din 11 Days Prabhavi Seva In Marathi
31 मार्च 2025 सोमवार ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रकट दिन आहे. हा दिवस अत्यंत शुभ व महत्वाचा दिवस आहे. ह्या अगोदरच्या विडियो मध्ये आपण 21 दिवसांची महाराजांची सेवा कशी करायची ते पाहिले. आपल्याला 21 दिवसाची सेवा करणे शक्य झाले नसेलतर आज आपण 11 दिवसांची सेवा कशी करायची ते पाहू या.
आपण जेव्हा महाराजांची सेवा करायचे ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. खर म्हणजे आपण सेवा कशा साठी करीत आहोत ते महाराजांना माहीत असते त्यांना काही सांगायची गरज नसते. श्री स्वामीची सेवा खूप जण करीत असत्तात व त्यांना सेवेचा प्रत्यय सुद्धा लगेच येतो फक्त आपण काही सोपे नियम पाळायचे आहेत. व श्रद्धेने सेवा करायची आहे.
आपण 11 दिवसांची सेवा 21 मार्च पासून सुरू करून 31 मार्च पर्यन्त करू शकता. पण जर काही अडचणी मुळे म्हणजे जर आपली मासिक पाळी मध्ये येणार असेलतर आपण आज पासून ही सेवा सुरू करू शकता.
आपल्याला 11 दिवसांची सेवा करताना रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करायचा आहे त्याच बरोबर 1 वेळा तारक मंत्र म्हणावयाचा आहे. आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचे रोज 21 आध्यायांचे पठन करू शकता. 21 आध्याय पठन करण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तास लागतात.
पण आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काही कामात असाल किंवा घरात लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील तर आपल्याला एका वेळी 21 आध्याय पठन करणे शक्य नसेलतर किंवा रोज 7 आध्याय पठन करून 3 दिवसांत संपूर्ण सारामृत पठन करू शकता.
आपण रोज 3 आध्याय पठन करून 7 दिवसांत संपूर्ण सारामृत पठन करू शकता. पण आपण जेव्हा पठन करायला आसनावर बसतो तेव्हा तेव्हडे आध्याय पठन झाल्या शिवाय उठायचे नाही. त्यामुळे आधीच तसा संकल्प करा की आपण रोज किती आध्याय पठन करणार ते.

आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 21 आध्याय पठन झाले की आपले एक पारायण पूर्ण झाले. आपण आधीच ठरवा की आपण किती पारायण करू शकता. व तेव्हडे पारायण आपण श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिना पर्यन्त पूर्ण करायचे आहे.
आपल्याला जेवहडी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवहडी आपण सेवा करायची आहे. सेवा करताना फक्त एक नियम अगदी काटाक्षाने पाळाव्याचा आहे. तो नियम म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. बाकी काही विशेष नियम नाहीत.
आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. आपण संकल्प स्वामींच्या माठात जाऊन करू शकता किंवा घरीच स्वामीच्या समोर बसून सुद्धा संकल्प करू शकता. संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडीसाखर स्वामीच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू करायची आहे.
श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा मग मंत्र जाप सुरू करा. मंत्र जाप झाल्यावर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तिना तीर्थ महणून द्या किंवा घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यामुळे शारीरिक रोग बरे होण्यास सुद्धा मदत होते.