चैत्र पूर्णिमा 2025 व्रत, पूजा मुहूर्त, महत्व लक्ष्मी प्राप्ती सटीक उपाय
12 April 2025 Chaitra Purnima Puja Muhurat And Lakshmi Prapti Upay In Marathi
हिंदू पंचांग अनुसार नवीन वर्षातील पहिली पूर्णिमा असून चैत्र महिन्यातील शेवटची तिथी चैत्र पूर्णिमा आहे. व ही तिथी विशेष महत्वाची मानली जाते. चैत्र पूर्णिमा ह्या दिवशी हनुमान जयंती, सत्यनारायण व्रत व पुण्य स्नानाचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी व शांती राहते. ह्या दिवशी उपवास केल्यास फळ प्राप्ती होऊन मनोकामना पूर्ण होतात.
चैत्र पूर्णिमा च्या दिवशी हनुमानजीनचा जन्म झाला होता म्हणून ह्या दिवशी हनुमान जयंती साजरी करतात. हनुमानजीनची पूजा केल्यास सर्व संकटा पासून मुक्ती मिळते. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दान धर्म करणे शुभ मानले जाते. चैत्र महिना संपला की वैशाख महिना चालू होतो. हिंदू धर्मामध्ये सर्वात पुण्याचा महिना मानला जातो. ह्या दिवसा पासून वैशाख स्नानाची सुरवात होते. चला आता आपण पाहूया चैत्र पूर्णिमा ह्या दिवसाचे महत्व काय आहे.
चैत्र महिन्यात हनुमानजीनची स्तुति केल्याने पितरांना तर्पण व दान करण्याचे महत्व आहे. 12 एप्रिल ह्या दिवशी चैत्र पूर्णिमा आहे ह्या दिवशी काही शुभ योग जुळून येत आहेत.
पंचांग अनुसार चैत्र पूर्णिमा तारीख व शुभ मुहूर्त:
पूर्णिमा तिथी सुरुवात 12 एप्रिल सकाळी 3:22 मिनिट सुरू होत असून समाप्ती 13 एप्रिल सकाळी 5:52 मिनिट. त्यामुळे पूर्णिमा तिथी व्रत 12 एप्रिल ह्या दिवशी ठेवायचे आहे.
चैत्र पूर्णिमा स्नान-दान शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त: 12 एप्रिल सकाळी 4:29 पासून सकाळी 5:14 मिनिट
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:56 मिनिट ते दुपारी 12:48 मिनिट पर्यन्त हे दोन्ही मुहूर्त शुभ आहेत.
चैत्र पूर्णिमा महत्व:
भारतीय संस्कृतिमध्ये चैत्र पूर्णिमाचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी हनुमान जन्म उत्सव साजरा करतात. ह्या दिवशी गंगा स्नान करणे विशेष महत्वाचे मानले जाते. भगवान विष्णु, माता लक्ष्मी व हनुमानजीनची पूजा करतात. पूर्णिमा आहे त्यामुळे सत्यनारायण भगवान ह्यांची पूजा करतात. दान करण्याचे विशेष महत्व आहे.
चैत्र पूर्णिमा पूजा विधि:
चैत्र पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे. जर हे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल घालून स्नान करावे. मग व्रत संकल्प करावा. चौरंगावर लाल रंगाचे कापड घालून त्यावर भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांचा फोटो ठेवावा. मग फोटोला चंदन, रोली,कुंकू, अक्षता अर्पित कराव्या. फूल, फळ व मिठाई अर्पित करावी. खिरीचा भोग दाखवणे शुभ मानले जाते. तुपाचा दिवा लावावा. कनकधारा स्तोत्र व विष्णु मंत्र जाप करावा. मग भगवान विष्णु व माता लक्ष्मीची आरती म्हणावी.

चैत्र पूर्णिमाच्या दिवशी पुण्य प्राप्त करण्यासाठी काय करावे:
चैत्र पूर्णिमाला स्नान दान करा. ह्या दिवशी सत्यनारायणची पूजा करतात. परिवारातील लोकांनी सत्यनारायणची कथा आइकावी त्यामुळे विष्णु कृपा मिळेल. खीर व मिठाईचा भोग दाखवतात. विष्णु मंत्र जाप करणे शुभ मानले जाते.
चैत्र पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला बताशेचा भोग:
बताशे शांती व शुद्धताचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्षातील पहिली पूर्णिमा तिथी आहे त्यामुळे माता लक्ष्मीला बताशेचा भोग दाखवल्यास सौभाग्यमध्ये वृद्धी होऊन सुख-शांतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. बताशेचा भोग दखवल्याने शुक्रदोष पासून छूटकारा मिळून भाग्योदय होतो.
चैत्र पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला केशरची खीरचा भोग:
चैत्र पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला केशरची खीरचा भोग दाखवल्याने मनोवांछित फळाची प्राप्ती होते. केशरची खीर माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे व त्यामुळे माता अन्नपूर्णाची कृपा मिळून दारिद्रता निघून जाते.
चैत्र पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला नारळाचा भोग:
नारळाला श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे फळ माता लक्ष्मीला द्यावे असे म्हणतात की पृथिवर भगवान विष्णु व माता लक्ष्मीनी पहिल्यांदा नारळाचे झाड लावले होते. ह्याचा भोग दाखवल्यास भगवान विष्णु व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.