हमुमान जयंती 2025 मंगळ असणाऱ्यानी व साडेसाती असणाऱ्यानी जरूर हे उपाय करा, उत्तम परिमाण मिळतील
12 April 2025 Hanuman Jayanti Manglik Dosha Remedy In Marathi
सनातन धर्मामध्ये हनुमान जयंती सौभाग्य प्राप्तीसाठी उत्तम फलदायी मानली जाते. त्यामध्ये ज्यांच्या कुंडलीमद्धे मंगळदोष आहे त्यांच्या साठी काही सटीक उपाय आहेत, ते केले तर चांगले लाभ होऊ शकतात.
हनुमान जयंती 12 एप्रिल 2025 शनिवार ह्या दिवशी पंचग्रही ह्या योगात येत आहे. हा योग 57 वर्षा नंतर येत आहे. ह्या दिवशी हनुमानजीनचा आशीर्वाद मिळण्यासाठी हनुमान चालीसा, हनुमान वडवानल स्तोत्र व पंचमुखी हनुमान कवचचे वाचन करावे.
भगवान हनुमान ज्यांना बजरंगबली, पवनपुत्र, अंजनीपुत्र, मारुती नंदन ह्या नावांनी ओळखले जाते. टे भगवान शिव ह्यांचे 11 वे रुद्रवतार मानले जातात. त्यांचा जन्म माता अंजनी व पिता केसरी ह्यांच्या आशीर्वादामुळे झाला. लहान पणा पासून त्यांच्यामध्ये अद्भुत शक्ति व पराक्रम होता. असे म्हणतात की आपण देवी-देवताना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करीत असालतर प्रथम हनुमान ह्यांना खुश केले पाहिजे.
हनुमान जन्मोत्सवच्या दिववशी बजरंगबली ह्यांची विधीपूर्वक पूजा केली पाहिजे. जर कोणाच्या कुंडली मध्ये मंगळदोष आहे तर ह्या दिवशी काही उपाय केले पाहिजे, टे उपाय जर केले तर त्याचे उत्तम परिणाम मिळतील व भाग्योदय होईल.
मंगलदोष असणाऱ्यासाठी कोणते उपाय आहेत ते पाहू या:
हनुमान जयंती च्या दिवशी मंगळदोष असणाऱ्या लोकांनी बजरंगबली ह्यांना चणे अर्पित करावे:
हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळदोष असणाऱ्या लोकांनी बजरंगबली ह्यांनया चणे म्हणजेच काबुली फुटाने भोग म्हणून अर्पित करावेत व प्रतेक मंगळवारी वानरांना सुद्धा चणे खावू घालावेत. त्यामुळे शुभ फळ प्राप्त होऊन कुंडलीमधील मंगळ ग्रह मजबूत बनतो. त्याच बरोबर भाग्योदय सुद्धा होतो. चणे हे शक्ति व ऊर्जाचे प्रतीक मानले जाते. हनुमानजिना चणे अर्पित करणे म्हणजे भक्ताला शक्ति, साहस व दृढ संकल्प प्राप्त होण्यास प्रेरणा मिळते.

मंगलदोषा पासून छूटकारा मिळण्यासाठी उपाय:
मंगळवार ह्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे म्हणजे मंगळ ग्रह मजबूत बनतो. हनुमान जयंती शनिवारी असली तरी सुद्धा आपण लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता. त्याच बरोबर ह्यादिवशी हनुमान कवच धरण करणे म्हणजे सुरक्षाकवच धरण केल्या सारखे आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा व ग्रहांची वाईट शक्तीचा प्रभाव होत नाही. तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे व शांत राहिले पाहिजे.
मंगळ असणाऱ्यांनी मसूरच्या डाळ दान केली पाहिजे:
मसूर डाळीचा व मंगळ ह्या ग्रहाचा जवळचा संबंध आहे असे मानले जाते व मंगळ ला ऊर्जा, साहस व वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते. ज्याच्या कुंडलीमद्धे मंगळदोष आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात किंवा विवाहामध्ये परेशानी येवू शकतात. मसुरडाळ ही लाल रंगाची असते म्हणून तिला मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते. मंगळदोष असणाऱ्याना विवाहामध्ये अडचणी येतात किंवा विलंब होतो किंवा परेशानी येते. मसूरडाळ दान केल्याने विवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्यास मदत होते.
हा सटीक उपाय केलातर हनुमानजी आपले सगळे प्रश्न सोडवतील:
हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमानजीना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा, हनुमान वडवानल स्तोत्र व पंचमुखी हनुमान कवचचे वाचन करावे. त्यामुळे हनुमानजी प्रसन्न होऊन आपल्या जीवनात परिवारीक सुख-शांती स्वास्थ , सुरक्षा व दीर्घायुष चा आशीर्वाद प्रदान करतील.