श्री रामनवमी 2025 शुभ संयोग, 7 सटीक उपाय मनोकामना पूर्ण होतील
Ram Navami 2025 Shubh Saiyog w 7 Satik Upaay In Marathi
6 एप्रिल 2025 रविवार राम नवमी साजरी करायची आहे. चैत्र शुल्क नवमी ह्या दिवशी भगवान श्री राम ह्यांचा जन्म झाला होता. म्हणून ह्या दिवशी श्री राम नवमी हा दिवस साजरा करतात. राम नवमी ह्या दिवशी काही दुर्लभ योग बनत आहेत, तम नवमी ह्या दिवशी काही उपाय केलेतर आपल्या मनोकमना पूर्ण होतील. ह्या दिवशी माता सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. ह्या दिवशी दुर्लभ योग बनत आहेत ते भक्तांना लाभकारी आहेत.
राम नवमी ह्या दिवशी कोणते शुभ संयोग आहेत:
राम नवमी ह्या दिवशी श्री राम ह्यांचा जन्म झाला होता तर ह्या दिवशी पुष्य नक्षत्रचा संयोग बनत आहे. रविवार हा दिवस आहे त्यामुळे रवी पुष्य योग बनत आहे. राम नवमी ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग सुद्धा बनत आहे. त्या शिवाय सुलक्ष्मी योग, मालव्या राजयोग, व बुधादित्य राजयोग पण आहे. ह्या शुभ संयोगमध्ये अहरी राम पूजन केलेतर भक्तांना लाभ होईल व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील.
श्री राम नवमी कधी साजरी करायची:
चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी तिथी ह्या दिवशी राम नवमी साजरी करायची आहे. ही तिथी 5 एप्रिल 7:27 ला सुरू होत असून 6 एप्रिल 7:24 पर्यन्त आहे. उदय तिथी 5 एप्रिलला आहे त्यामुळे राम नवमी ह्या दिवशी साजरी करावी. ह्या दिवशी श्री राम ह्यांची पूजा अर्चा करावी तुपाचा दिवा लाऊन आरती करावी. श्री रामस्तुतिचे महत्व आहे. अन्न व धान्यचे दान करावे. पुष्य नक्षत्र योग आहे त्यामुळे संपत्ति व सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
राम नवमीचे महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार धर्तीवर अधर्म व पाप वाढले होते तेव्हा भगवान विष्णु ह्यांनी अयोध्यामध्ये राजा दशरथ व कौशल्या ह्यांना पुत्रच्या रूपात जन्म घेतला. त्यांनी श्री राम ह्यांच्या वेश धरण केला व धर्म व मर्यादाची स्थापना केली व उच्च आदर्शचे पालन केले म्हणून ह्या कारणांनी ते मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून संबोधले गेले, राम ह्यांनी लंकाच्या रावणाचा वाढ केला होता व धर्म, सत्य, व करुणाचे राज्य पुन्हा स्थापित केले होते.
राम नवमी ह्या दिवशी करावयाचे उपाय:
1. राम नवमी ह्या दिवशी सकाळी स्नान-ध्यान झाल्यावर बालकांड ह्यांचे वाचन करावे. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील.
2. राम नवमी ह्या दिवशी तुळशीच्या 108 पानांवर श्री राम लिहावे. मग त्याची एक माळ बनवून श्री राम ह्यांना अर्पित करावी.
3. राम नवमी ह्या दिवशी राम मंदिरात सव्वा किलो डाळ व गूळ दान करावा. त्यामुळे सफलता मिळेल.

4. आपल्या विवाह कार्यात उशीर होत असेल किंवा काही विघ्न येत असतील तर श्री राम माता सीता ह्यांना हळकुंड, कुंकू व चंदन अर्पित करावे
5. जर आपण कोणत्या आजाराशी बरेच दिवसा पासून झटत आहात व त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हनुमान मंदिर मध्ये जाऊन हनुमान चालीसाचे पठन करावे.
6. संतान प्राप्ती साठी एक नारळ घेऊन लाल कापडात गुंडाळून माता सीताच्या चरणाशी अर्पित करावा. त्याच बरोबर ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करावा.
7. धन-समृद्धीसाठी राम नवमी ह्या दिवशी घरातील मुख्य दरवाजावर 11 दिवे लावावे व राम दरबारची पूजा करावी.