Bharleli Kanda Masala Andi Marathi Recipe

Stuffed Onion Masala Eggs
Bharleli Kanda Masala Andi

भरलेली मसाला अंडी Bharli Kanda Masala Andi : भरलेली मसाला अंडी ही चपाती बरोबर सर्व्ह करण्यासाठी आहे. भरलेली अंडी ही एक चवीस्ट डीश आहे. बनवायला एकदम सोपी आहे. ह्यामध्ये फक्त कांदा, आले, लसूण,लाल मिरची व थोडासा गरम मसाला वापरला आहे.
थंडीच्या दिवसात अंड्याचे विविध पदार्थ बनवता येतात. तसेच अंडी पौस्टिक तर आहेतच. उकडलेल्या अंड्याची ही डीश आपण करून बघा नक्की आवडेल.

बनवण्यासाठी वेळ : १५ मिनिट
वाढणी : ४ जणांना

साहित्य :
४ उकडलेली अंडी
२ टे स्पून कोथंबीर
२ टे स्पून तेल
४ मोठे कांदे
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने

Stuffed Onion Masala Eggs
Bharleli Kanda Masala Andi

कृती :
अंडी उकडायला ७-८ मिनिट ठेवा.
कांदा बारीक चिरून घ्या. आले-लसूण पेस्ट बनवून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसूण पेस्ट घालून गु;गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला व मीठ घालून दोन मिनिट परतून घ्या.
अंडी उकडल्यावर त्याची टरकले काढून त्याला वरती सुरीने हळुवारपणे उभा व आडवा चीर द्या मग त्यामध्ये १ टी स्पून वरील परतलेला मसाला भरा.
गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.